शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अखेर कारवाईचा आसूड ओढला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७साठी या सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा कठोर निर्णय घेतला असून, प्रवेशाबाबतची अधिकृत यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय प्रतिबंधित महाविद्यालये अमरावती : महाराष्ट्र कला (शिराळा), स्व. पंचफुलाबाई भारसाकळे कला-वाणिज्य (सातेगाव), श्रीराम कला, वाणिज्य व विज्ञान (मोर्शी), मधुबन कला व वाणिज्य (धारणी), डॉ. एस. एस. गोरडे विज्ञान (अचलपूर).
अकोला : गयादेवी जोशी आर्यभट, सौ. वैदेही विष्णू सराफ, गुलाम जैनुल आबोदिन कला (वाडेगाव), मेघे इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज, श्री. व्ही. के. जोशी महाविद्यालय (गायगाव).
बुलढाणा : ग्रंथालय व माहितीशास्त्र, श्रीरामभाऊ शेळके विधी (खामगाव), व्यवसाय प्रशासन, सत्यजित सायन्स (मेहकर), स्व. गजानन गावंडे विज्ञान (खामगाव), स्व. गणेश शिंगणे कला (देऊळगाव मही), सरस्वती महाविद्यालय (शेगाव), श्रीमती तुलसीबाई झांबड वरिष्ठ (नांदुरा), श्री सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान (जानेफळ), श्रीमती बसंतीबाई चांडक सहकार कला व वाणिज्य (डोंगरखंडाळा).
यासह यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे.