पाऊस थांबला गाळ साचला

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स
flood situation in the city silt accumulated due to heavy rain
शहरात बुधवार आणि गुरुवारी दिवस-रात्र मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी रात्री उशीरा मेनरोडसह शहरात पूरस्थिती अनुभवास आली आणि पूराच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ सर्वत्र साचला आहे.

मेनरोड परिसरात दिवसभर गाळ काढण्याचे काम नगर परिषद आरोग्य विभाग करीत होता. आजुबाजूच्या डोंगर टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे. शहरात सर्वत्र बांधकामांना वेग आला आहे. त्यात खोदलेल्या रस्त्यांची भर पडली आहे. त्यामुळे पाण्यासोबत वाहून येणारी माती गाळाच्या स्वरूपात शहरभर दिसून येते. भात आवणांप्रमाणे रस्त्यांची अवस्था झाली आहे.