मध्य रेल्वेकडून अजूनही दुर्लक्ष

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
passenger issues in central railway delays roof leaks and administrative neglect
मध्य रेल्वे वरील उल्हासनगर (फलाट क्र. २) आणि ठाणे (फलाट क्र. ६) येथे छतगळतीची समस्या कायम आहे. त्यातच लोकल गाड्यांना वारंवार होणारा विलंब आणि पाऊस यामुळे प्रवाशांना फलाटावर छत्री उघडून गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या समस्येकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.