गोरेंविरोधातहक्कभंग प्रस्ताव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
shiv sena mla bachchu kadu files privilege motion against minister jaykumar gore
मुंबई : ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनावरून आणि खासगी कंपन्यांच्या पॅकेजबाबत सभागृहात वारंवार चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

या प्रकरणात सभापती राम शिंदे यांनी संबंधित विभागाकडून तातडीने लेखी खुलासा मागवला आहे. आमदार कडू आणि मंत्री गोरे यांच्यात अधिवेशनादरम्यान संगणक परिचालकांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली होती. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला असताना, ‘संगणक परिचालक दरमहा ५० हजार रुपये कमावतात आणि त्यांना कमिशन म्हणून पगार दिला जातो,’ अशी माहिती गोरे यांनी दिली होती. कडू यांनी हा दावा अत्यंत चुकीचा असल्याचे म्हटले.