Solar powered Mobile Charging Facility For Pilgrims By Mahauarja
‘महाऊर्जा’तर्फे मोबाइल चार्जिंग सुविधा
महाराष्ट्र टाइम्स•
‘ महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’ (महाऊर्जा) कार्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाइल चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सोलर मोबाइल चार्जर संचाची व्हॅन येत्या २५ जुलैपर्यंत दिंड्यांबरोबर जाणार आहे. वारीच्या प्रवासादरम्यान वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत मोबाइलचा वापर करता यावा, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संचांमुळे अक्षय ऊर्जेचा प्रभावी वापर होणार आहे.‘महाऊर्जा’तर्फे वारीत शाश्वत ऊर्जेच्या प्रसारासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. सौरऊर्जेच्या वापराबाबतही जनजागृती केली जात असून, वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महाऊर्जा’तर्फे करण्यात आले आहे.