21 More Casualties In Assam Due To Floods Distress In Affected Areas
आसाममध्ये आणखी २१ मृत्युमुखी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत सतत पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पुरात बुधवारी आणखी २१ जणांचा मृत्यू झाला. ५.६५ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुरातील मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी अप्पर आसाम जिल्ह्यांतील अनेक पूरग्रस्त भागांना भेट देऊन पीडितांशी संवाद साधला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केले. पाण्याखाली असलेल्या गावांत मदत साहित्य पोहोचविण्यात अडचणी आल्याचे सरमा म्हणाले.