नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी मध्य प्रदेश केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अनुराग जैन यांची निती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा झेंडा दाखवला आहे. जैन तत्काळ पदभार स्वीकारतील आणि त्यांना मंजूर करण्यात आलेल्या सेवावाढीच्या कालावधीत पदावर कार्यरत राहतील. त्यानंतर ते एकूण दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत आयोगाचे सीईओ म्हणून कार्यरत राहतील.