Bmd Testing Camp An Opportunity To Take Care Of Health
‘बीएमडी’ तपासणी शिबिर सुरू
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे हाडांची ठिसुळता स्पष्ट करणाऱ्या (बीएमडी) तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २८ जुलैपर्यंत चालणाऱ्या शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले.
अस्थिव्यंगोपचार विभागाच्या ओपीडी ११६ मध्ये रोज ही तपासणी होणार आहे. तसेच शुक्रवारी पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, तर सोमवारी गंगापूर, कन्नड व इतर ठिकाणी तपासणी होईल. कार्यक्रमाला विभागप्रमुख डॉ. एम. बी. लिंगायत, उपअधिष्ठाता डॉ. के. डी. गर्कल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, अभ्यागत समिती सदस्य राजू अहिरे, प्रा. डॉ. अनिल धुळे, डॉ. गजानन देशमुख, डॉ. मुक्तदीर अन्सारी, डॉ. नीलेश कचनेरकर उपस्थित होते..