मारोतीनगरात घरफोडी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
burglary in marotinagar educational documents and pension stolen
छत्रपती संभाजीनगर : घराचे कुलुप तोडून शैक्षणिक तसेच निवृत्ती वेतनाचे आणि मालमत्तेचे कागदपत्रे चोरण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

ही घटना मारोतीनगर , मयूर पार्क येथे १६ जुलै रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.
या प्रकरणी अभिषेक शिंदे यासह अन्य एका जणाविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण तुपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला आणि फिर्यादीचे काही शैक्षणिक कागदपत्राची दुय्यमप्रत, फिर्यादी यांच्या आईचे निवृत्तीचे कागदपत्र, शैक्षणिक तसेच निवृत्ती वेतनाचे आणि मालमत्तेचे कागदपत्रे चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.