गुणपत्रिकांचे आज वाटप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
distribution of mark sheets for 10th and 12th examinations today
छत्रपती संभाजीनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जून-जुलै मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या एकत्रित गुणपत्रिका, उत्तीर्ण प्रमाणपत्राचे वाटप गुरुवार, २३ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

मंडळाकडून संबंधित मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सकाळी ११ वाजता गुणपत्रिका व इतर परीक्षा साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी तीनला वाजता संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.