‘आंदोलनाला परदेशातून मदत’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
foreign aid to the movement serious allegations
नागपूर : दिल्लीतील आंदोलनासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गंभीर आरोप केले. सध्या सुरू असलेली आंदोलने प्रायोजित असून, त्यांना परदेशातून निधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला; तसेच या आंदोलनांमागील सूत्रधार आणि निधीचा स्रोत लवकरच उघड होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी नागपूर दौऱ्यावर आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.