कराची : पाकिस्तानमधील कराची येथील एका सरकारी रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणामुळे लहान मुलांमध्ये ‘एचआयव्ही’चा प्रादुर्भाव झाला. नोव्हेंबर २०२५पासून आतापर्यंत ९४ लहान मुलांना ‘एचआयव्ही’ची लागण झाली असून, यामुळे सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित वृत्त... फ्रंट पेज २चिमुकलीचा मृत्यू
शिरूर : आई- वडिलांसोबत गोठ्याबाहेर झोपलेल्या ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पिंपळसुटी (ता. शिरूर) परिसरात बुधवारी पहाटे घडली. भाग्यश्री संदीप वारे असे मृत मुलीचे नाव आहे.
राम मंदिरात सीईओंची निवड महिन्यानंतर
अयोध्या : पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदासाठी ५,२०० अर्ज आल्यावर, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने बुधवारी निवड प्रक्रिया महिन्याने पुढे ढकलली. हंगामी सचिव नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. रिक्त विश्वस्त पदे भरण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीचा व आर्थिक मुद्द्यांचा आढावा घेतला गेला.