काँग्रेस-भाजप आमनेसामने

महाराष्ट्र टाइम्स
intense protest between congress and bjp opposition mounted outside modis residence
काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलन ाचा भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शहागंज येथील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिगेट्स लावत आंदोलनकर्त्यांना रोखून ठेवले होते. तर दुसरीकडे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील ठाण मांडून बसले होते. दरम्यान, पोलिसांनी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाईनंतर सोडून दिले.

ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी खासदार डॉ. भागवत कराड, माजी आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. क

ाँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी नमूद केले.

पोलिसांनी खबरदारी म्हणून गांधी भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिगेट्स लावले होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना काँग्रेस कार्यालयासमोर जाता आले नाही. काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅरिगेट्स बाजुला करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तो हाणून पडला.

अराजकता आणि गोंधळ म्हणजे काँग्रेसची ओळख, लोकशाहीचा अपमान ही काँग्रेसची ओळख यासह अन्य काँग्रेस विरोधी पोस्टर आंदोलनकर्त्यांच्या हाती होते. महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेवक हर्षवर्धन कराड, राजगौरव वानखेडे, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, नंदू गवळी, सुरेंद्र कुलकर्णी, अमृता पालोदकर, माधुरी अदंवत, कीर्ती शिंदे, राहुल दांडगे, डॉ. उज्वला दहिफळे, यज्ञेशे बसैये यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करत अशा प्रकारची आंदोलने लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी मंत्री सावे, माजी खासदार कराड यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सिटी चौक पोलिस ठाण्यात नेले आणि कायदेशीर कारवाईनंतर सोडून दिले.