चाकूने हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
knife attack youth seriously injured in chhatrapati sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : जुन्या भांडणावरुन एका युवकावर चाकूने हल्ला करत जखमी करण्यात आले. ही घटना संजयनगर कमानीजवळ सोमवारी घडली. याप्रकरणी रोहित पगारे, तेजस पगारे विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले. अशितोष शरणागत याने दिलेल्या तक्रारीनुसार, दुचाकीतील पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत फिर्याही हे पेट्रोल पंपाकडे जात होते. त्यावेळी काळू पगारे नावाच्या व्यक्तीसोबत झालेल्या भांडणावरुन रोहित व तेजस याने फिर्यादीला शिवीगाळ केली तर तेजस याने चाकूने वार करत जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करत आहेत.