New Water Supply Scheme Provides 392 Mld To Chhatrapati Sambhajinagar City
शहराला नवीन योजनेतून पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पान १ वरून
सुरुवातीला सावे यांनी व्हॉल्व्हचे पूजन केले. यावेळी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोगुलोथू, नगरसेवक शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, मनोज गांगवे, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, किशोर नागरे ,विश्वनाथ स्वामी यांच्यासह महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. १९९१नंतर २०२६ छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडूनच करण्यात आले आहे.
प्राधिकरणाने पहिली पाणीपुरवठा योजना १९७५मध्ये कार्यान्वित केली. या योजनेची क्षमता ५६ एमएलडी होती. त्यानंतर १९९१ साली दुसरी योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेची क्षमता १०० एमएलडी आहे. त्यानंतर आता २२ जुलै २०२६ रोजी तिसऱ्या योजनेचे पाणी शहरात दाखल झाले. या योजनेची क्षमता ३९२ एमएलडी आहे.
पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी घेण्याचे नियोजन केले आहे. सध्या अस्तित्वातील योजनेतून ३५ आणि आता सिडकोसाठी १२ एमएलडी पाणी देण्यात येणार आहे.