सरपंच हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी २९ला

Contributed byम. टा. प्रतिनिधी. बीड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
next hearing of sarpanch murder case on july 29
जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान बुधवारी विविध अर्जांवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २९ जुलै रोजी दिली आहे.

बुधवारच्या सुनावणीदरम्यान एकत्रित आरोपपत्र दाखल करता येईल का, यासंदर्भातील मुद्द्यावर चर्चा झाली.
या वेळी काही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, याच मुद्यावर उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असल्याने या प्रकरणाला पुढील तारीख देण्यात यावी. मात्र, सरकारी पक्षाच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत उच्च न्यायालयातील सुनावणी आणि सध्याच्या सुनावणीचा थेट संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी ठेवण्याचे आदेश दिले.