Women Officers Successfully Complete Sea Circumambulation
जिद्दीने पूर्ण केली सागर प्रदक्षिणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : खवळलेल्या समुद्रातून जेमतेम ५० फुटांची शिडाची नौका घेऊन सागर प्रदक्षिणा पूर्ण करून भारतीय सैन्यदलातील महिला अधिकारी ३४१ दिवसांनी मायदेशी परतल्या आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करून २५ हजार ५०० सागरी मैल अंतर कापून असंख्य आव्हाने झेलत मोहीम यशस्वी करणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलातील नऊ अधिकाऱ्यांसाठी बुधवारी ‘ गेटवे ऑफ इंडिया ’ येथे खास समारंभ झाला.