खुलताबाद : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून; तसेच तेथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ खुलताबाद तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याचे नेतृत्व सतीश लोखंडे यांनी केले. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी तहसीलदार संतोष गुट्टे, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.