साडेसहाशे कुटुंबांचे स्थलांतर

महाराष्ट्र टाइम्स

चांदोरी-सायखेड्यात दोनशेहून अधिक दुकानांचे नुकसान

Maharashtra Times
धुळे : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले. साक्री तालुक्यातील पांझरा नदीत दुपारी दीडच्या सुमारास जेठीबाई कुवर (वय ६५) या ज्येष्ठ महिला बुडाल्या.दुसऱ्या घटनेत बल्हाणे गावाजवळील गटखळ नदीत भारत माळी (वय ४०) हे वाहून गेले. या दोन्ही घटनांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे चांदोरीतील सुमारे ४००, तर सायखेड्यातील सुमारे २५० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. चांदोरीतील १००, तर सायखेड्यातील १२५ दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, प्रशासनाकडून पंचनामे आणि नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.