जर्मनी संघाची सूत्रेक्लॉप यांच्याकडे

Contributed byबर्लिन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

फुटबॉल वर्ल्ड कपनंतरचे बदल सुरू

Maharashtra Times
जर्मनी फुटबॉल संघाच्या मार्गदर्शकपदी जर्गन क्लॉप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत जर्मनीला पहिल्याच लढतीत हार पत्करावी लागली. त्यानंतर युरो कपपर्यंत करार असलेल्या ज्युलीयन नागेल्समन यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला.

क्लॉप ५९ वर्षांचे असून, ते ज्युलीयन यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. क्लॉप यांच्यासह असलेला करार २०३०च्या वर्ल्ड कपपर्यंत आहे. ‘जर्मनीचा संघ खेळत असताना त्याला संपूर्ण देशाची साथ लाभते. या संघाचे मार्गदर्शकपद कसे नाकारणार,’ अशी विचारणा क्लॉप यांनी केली. क्लॉप यांनी २०२४मध्ये लिव्हरपूलचे मार्गदर्शकपद सोडले होते. त्या वेळी आपण खूप थकलो असल्याचे त्यांनी सांगितले होते. नेशन्स लीगसाठी संघास तयार करणे हे क्लॉप यांच्यासमोरील प्राथमिक आव्हान असेल.
‘सर्वोत्तम मार्गदर्शकच हवेत’, असे सांगणाऱ्या इटली महासंघाचा नव्या मार्गदर्शकांचा शोध संपलेला नाही. कार्लो अॅन्सेलितो यांच्याबरोबरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ‘मँचेस्टर सिटी’चे मार्गदर्शक पेप गॉर्डिओलो यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. इटली नव्या मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील आहे. इटलीने सर्वोत्तम मार्गदर्शक तयार होत नाहीत, तोपर्यंत पद रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.