Anand Now Interim President Of Fide Plays A Crucial Role In Global Chess Rankings
आनंद ‘फिडे’चेअंतरिम अध्यक्ष
Contributed by: नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाचे अध्यक्षपद भारतीयांना क्वचितच लाभते. भारतीय बुद्धिबळाची जागतिक ताकद वाढत असतानाच विश्वनाथन आनंद यांची जागतिक बुद्धिबळ महासंघाचे ( फिडे ) अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्याचे अध्यक्ष आर्कदी द्वोर्कोविच यांच्यावर युरोपियन युनियनने निर्बंध घातल्यामुळे आनंद यांच्याकडे जबाबदारी आली आहे.
द्वोर्कोविच हे २०१२ ते २०१८ दरम्यान रशियाचे उपपंतप्रधान होते. ते २०१८मध्ये ‘फिडे’च्या अध्यक्षपदी निवडून आले. रशियाने युक्रेनवरील हल्ला कायम ठेवल्यामुळे द्वोर्कोविच यांच्यावर युरोपियन युनियनने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अंतरिम अध्यक्षांची निवड करणे ‘फिडे’ला भाग पडले आहे. त्या पदावर आनंद यांची निवड झाली आहे. ‘द्वोर्कोविच यांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे ‘फिडे’च्या नियमावलीनुसार मी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे,’ असे आनंद यांनी ‘एक्स’द्वारे जाहीर केले. बुद्धिबळाच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही आनंद यांनी सांगितले.