‘गोलंदाजीत चांगली सुधारणा’

Contributed byहरारे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
indian bowlers improved performance joshis statement
भारताच्या नवोदित गोलंदाजांच्या कामगिरीत चांगली सुधारणा होत असल्याचे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी केले. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिकेत आज, शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी जोशी यांनी हे भाष्य केले.

भारतीय गोलंदाज आपल्या चुकांतून शिकत आहेत, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले. रवी बिश्नोईच्या एका षटकांत इंग्लंडच्या जेकब बेथेलने २९ धावा वसूल केल्या होत्या. मात्र, बिश्नोईने झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत २४ धावांच दिल्या. ‘भारतीय संघाला विजयाची नितांत गरज होती. तो साध्य झाला. गोलंदाजांनी त्यात चांगली कामगिरी केली. बिश्नोईने त्याच्या शैलीत माफक बदल केला. त्याचा त्याला फायदा झाला. साईराज बहुतुले यांच्यासह केलेल्या चर्चेचाही फायदा झाला,’ असे जोशी यांनी नमूद केले.