कन्नड येथेबंदची हाक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
protest for bandh demand in kannada condemnation of police baton charge in delhi
कन्नड : वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभेच्या कन्नड शाखेच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी निषेध व्यक्त करून बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या वेळी बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, जिल्हा संघटक राजेंद्र पगारे, तालुकाध्यक्ष रमेश धनेधर, महिला जिल्हाध्यक्ष लता अवचार, महिला तालुकाध्यक्ष कल्पना मनवर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव चोतमल, जिल्हा संघटक देविदास राठोड, तालुकाध्यक्ष सुनील सिरसाठ, तालुका संघटक रवींद्र जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक सी. बी. पवार, तालुकाध्यक्ष बाबासाहेब सिरसाठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुकाध्यक्ष संदीप सातदिवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कन्नड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ सानप यांनी निवेदन स्वीकारले.