महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री समृद्धी पांदण रस्ते योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात ९१९ पांदण रस्त्यांची कामे मंजूर झाली. ही कामे २०२५किंवा २०२६च्या उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या योजनेतून केवळ १७ पांदण रस्ते पूर्ण झाले तर उर्वरित रस्ते रखडल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मातोश्री समृद्धी पाणंद रस्ता योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून एक किमी पांदण रस्त्यासाठी २० लाख रुपये, दीड किमीसाठी ३० लाख तर दोन किमीसाठी ४० लाख रुपये दिले जातात. वर्धा जिल्ह्यात ९१९ कामांपैकी हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील २८२ रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यान्वित यंत्रणा म्हणून आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ६३७ कामे ग्रामपंचायत स्तरावर आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे ३३० रस्त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आहे, तर गटविकास अधिकाऱ्यांकडे ४६३ रस्त्यांसाठी प्रशासकीय मान्यता आणि देखरेखीची नियंत्रक म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या आकडेवारीनुसार, सेलू तालुक्यात दोन वर्षांपासून ७२ पांदण रस्ते मंजूर आहेत. देवळी तालुक्यात १४६, वर्धा १०६, आर्वी १६४, आष्टी १००, कारंजा ९७, समुद्रपूर ११४ आणि हिंगणघाट तालुक्यात १२० पांदण रस्ते मंजूर आहेत. या सर्व रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण, निधी मंजूर असूनही रस्ते अर्धवट, निकृष्ट आणि चिखलात अडकलेलेच राहिले आहेत.