विद्यार्थ्यांचा योग्य पवित्रा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विद्यार्थ्यांचा योग्य पवित्रा
सीजेपीचे आंदोलन आणखी तीव्र होत असल्याने भाजपचे काही लोक आता ते मोडीत काढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. अभिजित दीपकेंवर आरोप करून हे आंदोलन बदनाम करण्यासाठी काही तरुणांना आमिष दाखवले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर उघड केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांमागे आता सामान्य नागरिकांची शक्ती उभी ठाकली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पेपरफुटीतील आरोपींवर फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे स्पष्ट केले तरी कारवाई होणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. त्याची घोषणा करावी लागणे हेच मुळी आश्चर्यकारक आहे. मुळात जबाबदारी कोण घेणार? केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देणे हेच एकमेव उत्तर आहे. त्यावर विद्यार्थी ठाम असणे ही भूमिका योग्य वाटते.

- सुपर्णा वैद्य, नाशिक
यामागे कारस्थान?

सध्या सुरू असलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत काही प्रश्न आहेत. अभिजित दीपके यांची विद्यार्थिदशा अजून सुरू आहे किंवा कसे? त्यांना राजकीय चळवळ, पक्ष स्थापन करावयाचा असल्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी व त्यांचे उद्दिष्ट यात संबंध काय? इतर राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती समजू शकतो, पण चित्रपटसृष्टी, खेळाडू, वाहिन्यांवरील कलाकारांचा या आंदोलनातील सहभाग/पाठिंबा माझ्या आकलनापलीकडचा. मग हे केवळ देशात अराजक माजविण्याचं कारस्थान आहे का?

- प्रशांत चोपडे, नाशिक

रस्त्यांची लागली ‘वाट’

नाशिक मनपाचा ई-बस खरेदीचा प्रलंबित निर्णय मार्गी लागल्याचे वृत्त वाचले; मात्र शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता हा आनंद अपुरा वाटतो. सिंहस्थापूर्वी, मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत रस्ते, पावसाळी गटारे व वाहतूक व्यवस्था खरोखर वेळेत आणि दर्जेदार होतील का, हा प्रश्न गंभीर आहे. इंदिरानगर अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचून दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. नागरिकांचा संयम संपत असून, लोकप्रतिनिधींनीही केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष पाठपुरावा करणे आवश्यक आहे; अन्यथा नाशिककरांचा त्रास वाढतच राहील.

- सुधाकर चव्हाण, नाशिक

विद्यार्थ्यांचा योग्य पवित्रा



विद्यार्थ्यांचा योग्य पवित्रा