कसोटी संघाचीमंगळवारी निवड

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स
indian test team selection on tuesday preparations for sri lanka series underway
श्रीलंकेतील दोन क्रिकेट कसोटींच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीस भारताच्या टी-२० संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.

श्रीलंकेतील कसोटी मालिका भारतीय फिरकी गोलंदाजांची; तसेच भारतीय फलंदाजांच्या फिरकीचा सामना करण्याच्या क्षमतेची चाचणी असेल. ही मालिका १५ ऑगस्टपासून होणार आहे. ‘श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी निवड समिती दोन दिवस चर्चा करणार आहे. त्यानंतर मंगळवारी संघाची घोषणा होईल,’ असे सैकिया यांनी सांगितले. दरम्यान, भारताच्या टी-२०मधील कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) घेतला आहे.