Maharashtra Teams Leadership Entrusted To Sarthak Wankhede New Challenge In India pakistan Hockey Match
महाराष्ट्र संघाचे नेतृत्वसार्थक वानखेडेकडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : कोइमतूर येथे होणाऱ्या ज्युनियर गटाच्या सोळाव्या ‘ हॉकी इंडिया ’ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मुलांचा संघ जाहीर झाला असून, या संघाचे नेतृत्व नागपूरच्या सार्थक वानखेडेकडे सोपवण्यात आले. पिंपरीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये तयारी शिबिर झाले. त्यातून खेळाडूंची निवड करण्यात आली. ‘हॉकी महाराष्ट्र’चे अध्यक्ष कृष्ण प्रकाश यांनी अठरा सदस्यीय संघ जाहीर केला. ही स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होईल. उपकर्णधारपदी स्ट्रायकर सूरज शुक्लाची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचा ‘ब’ गटात समावेश आहे.
भारत-पाक लढतमस्कत : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आशियाई युवा हॉकी फाइव्ह स्पर्धेची अंतिम लढत होईल. भारताने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ७-३ असा आणि ओमानचा १०-१ असा पराभव करून आपले एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले. भारतीय युवकांनी स्पर्धेतील तिन्ही लढतींत एकतर्फी विजय मिळवला. भारतीयांनी सहा सामन्यांत तब्बल ५३ गोल करताना १४ स्वीकारले.
दहा गोलचा धडाका
मस्कत (ओमान) : भारतीय मुलींनी आशियाई युवा हॉकी फाइव्ह स्पर्धेतील गटसाखळी लढतीत उझबेकिस्तानचा १०-० असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरी निश्चित केली. त्यापूर्वी भारतास चीनविरुद्ध ३-६ अशी हार पत्करावी लागली होती. भारताने चीनला ३-३ असे रोखले होते; मात्र उत्तरार्धात भारतीयांचा खेळ खालावला. भारतासमोर आता कझाकस्तानचे आव्हान असेल.