Mh Cet Exam Chaos Congress Demands Judicial Inquiry
‘एमएचटी-सीईटीतही प्रचंड गोंधळ’
Contributed by: मुंबई|महाराष्ट्र टाइम्स•
नीटप्रमाणेच महाराष्ट्रातील ‘ एमएचटी-सीईटी ’तही प्रचंड गोंधळ सुरू असून, सन २०२२पासून या परीक्षेत अनागोंदी प्रकार होत असल्याचा आरोप काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दहावी-बारावीत ४० ते ५० टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये ९०पेक्षा अधिक पर्सेंटाइल, तर बारावीत ६० टक्के गुण मिळालेल्यांना ९९ पर्सेंटाइल मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत, असा दावा सावंत यांनी केला.