जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने आधार माणुसकीचा व्यसनमुक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे लेह, लडाख येथे व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन केले. संस्थेचे सदस्य दादासाहेबब भंडे, रूपाली भंडे, प्रणव भंडे, चेतन भोंगळे, विष्णू बोर्डे यांनी छत्रपती संभाजीनगर ते लेह, लडाख असा दुचाकीने नुकताच प्रवास केला. या प्रवासा दरम्यान येथे कार्यकर्त्यांनी जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेत नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.






