छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागातून पाच दुचाकी चोरी गेल्या. अनिकेत डॅनियल रननवरे यांची दुचाकी रांजणगाव शेणपुंजी येथून, शिवनाथ अंकुश सोनवणे यांची दुचाकी जोगेश्वरी परिसरातून, शेख मोहमद इलियास अब्दुल रज्जाक शेख यांची दुचाकी घरासमोरून, मंगेश प्रभु चोपडे (रा. अहिल्यादेवीनगर, कांचनवाडी) यांची दुचाकी घरासमोरून, शेख जमीर शेख रफीक यांची दुचाकी हर्सूल गावातील हनुमान मंदिरासमोरून चोरण्यात आली.
पायावरून नेली ट्रक
छत्रपती संभाजीनगर : करोडी शिवारात ट्रक चालकाने झोपलेल्या चालकाच्या दोन्ही पायांवरून ट्रक नेला. ही घटना ३० मे रोजी पहाटे घडली. अमोल भागवत मोरे (वय २८, रा. तिडका, ता. सोयगाव) यांनी तक्रार दिली. ते चालक आहेत. ते ओम लॉजिस्टिक कंपनी परिसरात झोपलेले होते. त्यावेळी ट्रक क्रमांक एचआर-४६-जी-७३२२ च्या चालकाने पायांवरून वाहन नेले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे तपास करीत आहेत.
तरुणाला मारहाण
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ वादातून तरुणाला दोन भावांनी शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी वाळूज परिसरातील कमळापूर रोडवरील बाजार गल्लीत घडली. या प्रकरणात हर्षल गजेंद्र बनकर यांनी तक्रार दिली. मारहाण करणाऱ्या रानू घोरपडे याच्यासह त्याच्या भावाच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शेळके तपास करीत आहेत.
मोपेडची धडक
छत्रपती संभाजीनगर : ऑर्डर पोहोचविण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या एका डिलिव्हरी बॉयला वेगाने आलेल्या मोपेडने धडक दिली. ही घटना सोमवारी रात्री बीड बायपासवरील एमआयटी पुलाजवळ घडली. या प्रकरणी कपिल सुरेश साखरे यांनी तक्रार दिली. सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भंडारे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोबाइल लंपास
छत्रपती संभाजीनगर : वॉकिंग प्लाझा येथे फळ खरेदी करताना एकाच्या खिशातून मोबाइल चोरण्यात आला आहे. ही घटना २४ मे रोजी सकाळी सातला घडली. या प्रकरणात शशिकांत उद्धव महादार (रा. कोकणवाडी) यांनी तक्रार दिली. ते महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या परिक्रमा खंडपीठात कार्यरत आहेत. २४ मे रोजी सकाळी ते आरटीओ कार्यालयासमोरील वॉकिंग प्लाझा येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा मोबाइल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी तक्रारीवरून छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार जाधव करीत आहेत.






