सेपक टकरा स्पर्धेसाठी परभणीचे संघ रवाना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर येथे होणाऱ्या ३६ व्या वरिष्ठ व २७ व्या ज्युनिअर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचे ज्युनिअर मुली, ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ पुरुषांचे संघ रवाना झाले आहेत. सेलू येथे खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. अनुराग आंबटी आणि संजय भुमकर हे संघाला मार्गदर्शन करत आहेत. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत.

सेपक टकरा स्पर्धेसाठी परभणीचे संघ रवाना

परभणी : महाराष्ट्र राज्य सेपक टकरा असोसिएशन आणि नागपूर जिल्हा सेपक टकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वी वरिष्ठ व २७वी ज्युनिअर महाराष्ट्र राज्य सेपक टकरा क्रीडा स्पर्धा ४ ते ७ जून या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा ज्युनिअर मुली, ज्युनिअर मुले आणि वरिष्ठ पुरुषांचा संघ बुधवारी नागपूरकडे रवाना झाला.

सेलू येथे नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संघाला अनुराग आंबटी आणि संजय भुमकर हे प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत. या वेळी प्रभारी मुख्याध्यापक सु. ल. जोशी, जिल्हा सचिव गणेश माळवे, राजेंद्र मुंढे, नितीन लोहट, प्रशांत नाईक, महंमद इकबाल, सज्जन जैस्वाल, कैलास टेहरे, अब्दुल सत्तार, बी. एस. हेलसकर, आर. एस. सोनवणे आणि एम.टी. डमरे यांनी शुभेच्छा दिल्या.

परभणी जिल्हा संघ (ज्युनिअर मुली) : ओमश्री गायकवाड, मानसी कुलकर्णी, सुमित्रा गव्हाडे, प्रगती कदम, अनुष्का चव्हाण, सान्वी हेलसकर, श्रुतिका गटकळ, श्रावणी दवे आणि मुक्ता घोडके.

ज्युनिअर मुले संघ : जितेश भिसे, सूरज मोगल, कार्तिक सातपुते, समर्थ काकडे, यश साडेगावकर, अभय वाघ, संग्राम कदम, चैतन्य बोराडे, प्रसाद महाले, कृष्णा गुंगे, प्रताप पौळ, कार्तिक लिंगे, अर्जुन भिमाशंकर, आर्यन गायके आणि पार्थ दहिवाल

वरिष्ठ पुरुष संघ : पांडुरंग केंद्रे, रामेश्वर टेकाळे, नीलेश बानाटे, मनीष बिस्वास, निलेश काळंखे, श्रीसाई पोफळे, कृष्णा राठोड, विनोद राठोड, चेतन मुक्तावार, गणेश देवकर, सिद्दीक अन्वर, पृथ्वीराज वाघमोडे, जितेश भिसे आणि आर्यन गायके.