Pratap Salunke Wins Bronze Medal In Ice Stock Competition
आईस स्टॉक स्पर्धेतप्रताप साळुंकेला ब्राँझ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत आईस स्टॉक क्रीडा प्रकारात छत्रपती संभाजीनगरच्या प्रताप साळुंकेने सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकले. १९ वर्षांखालील स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधित्व करत प्रतापने हे यश मिळवले. क्रीडा शिक्षक प्रणव तारे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले. महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला.
छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत आईस स्टॉक क्रीडा प्रकारात शहरातील विद्यार्थी प्रताप साळुंके याने सांघिक प्रकारात ब्राँझपदक पटकावले. आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या प्रताप याने १९ वर्षांखालील स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याला क्रीडा शिक्षक प्रणव तारे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्कृष्ट संघाचा पुरस्कार पटकावला.