सेकंड हँड कारची बाजारपेठ टॉप िगअरमध्ये

Contributed byईटी वृत्त|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतातील जुन्या गाड्यांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंटच्या अहवालानुसार, २०३०-३१ पर्यंत ही बाजारपेठ ७० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. सध्या वर्षाला साठ लाख गाड्यांची विक्री होते, जी भविष्यात ९० लाखांपर्यंत जाईल. एसयूव्ही गाड्यांना जास्त मागणी आहे. मोठी आकारमान, अधिक वैशिष्ट्ये आणि आकर्षक डिझाइनमुळे जुन्या गाड्यांना पसंती मिळत आहे.

सेकंड हँड कारची बाजारपेठ टॉप िगअरमध्ये

भारतातील सेकंड हँड कारविक्रीच्या बाजारपेठेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सेकंड हँड कारना असलेली वाढती मागणी पाहता २०३०-३१च्या आर्थिक वर्षांपर्यंत ही बाजारपेठ ७० अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज ‘रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट’ने ताज्या अहवालात व्यक्त केला आहे.

भारतात सद्यस्थितीत दर वर्षी अंदाजे साठ लाख सेकंड हँड कारची विक्री होते. पुढील पाच वर्षांत हा आकडा ९० लाख ते एक कोटीवर पोहोचेल, असा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. नवी कार विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने सेकंड हँड कार घेण्याकडे अनेकांचा कल होता. मात्र, आता ही मानसिकता बदलत आहे, असे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

यामध्ये एसयूव्ही कारना अधिक मागणी असल्याचे दिसत आहे. मोठ्या आकाराची कार, अधिक वैशिष्ट्ये, विविध स्वयंचलित यंत्रणा, आकर्षक अंतरंग, सनरूुफ आदी वैशिष्ट्यांची खरेदीदारांना भुरळ आहे. ही सारी वैशिष्ट्ये सेकंड हँड कारच्या माध्यमातून मिळवण्यास कारप्रेमींची पसंती आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.