अय्यर किंवा तिलकभारताचा कर्णधार?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सूर्यकुमार यादवला हटवले जाण्याची दाट शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा हे कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करेल. इंग्लंड दौऱ्यात हा बदल दिसू शकतो. सूर्यकुमारच्या खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थानही धोक्यात येऊ शकते.

shreyas iyer or tilak varma who will be the new captain of the indian t 20 cricket team

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता आहे. सूर्यकुमारनंतर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्यात हा बदल दिसू शकतो. राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे चर्चा करून सूर्यकुमारच्याबाबत निर्णय घेतील. सूर्याला कर्णधारपदावरून हटवले गेले, तर गेल्या जवळपास १८ महिन्यांच्या खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील खेळाडू म्हणून असलेले स्थानही धोक्यात येईल, हे स्पष्ट आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे श्रेयस अय्यरबाबत काही आक्षेप आहेत. २०२४ च्या आयपीएलमध्ये हे दोघे कोलकाता संघात होते.