छत्रपती संभाजीनगर : बालोन्नती फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. डॉ. रेणुका भावसार प्रमुख पाहुणे होत्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून एकल मातांनी आत्मविश्वासाने उभे राहावे, असे आवाहन डॉ. भावसार यांनी केले.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेंतर्गत एकल माता , एकल पालकांच्या कुटुंबातील मुली व किशोरींसाठी ‘पूर्णांगिनी माऊली – सुरक्षित लेक’ हा कार्यक्रम झाला. गुड टच – बॅड टच या विषयावर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मनोहर बन्सवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नरहरी शिवपुरे, सुप्रिया इंगळे, स्नेहा देव, ज्योती देशमुख, हर्षली बन्सवाल, कुणाल राठोड आदी उपस्थित होते.






