जमिनीच्या वादातून एकाला मारहाण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टोकी येथे शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली. शुभम बाळू भुसारे, रितेश बाळू भुसारे आणि पुष्पा बाळू भुसारे यांनी बाबासाहेब लक्ष्मण भुसारे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार गिरी तपास करत आहेत.

farmer assaulted over land dispute case filed against nephew and sister in law

छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्या वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी वाद घालून मारहाण केली. ही घटना गंगापूर येथील टोकी येथे नऊ जूनला रात्री अकराला घडली.

या प्रकरणी बाबासाहेब लक्ष्मण भुसारे (वय ५५, रा. टोकी, ता. गंगापूर) यांनी तक्रारीनुसार, शेतजमिनीच्या वादातून त्यांच्या घराच्या समोर त्यांचे पुतणे शुभम बाळू भुसारे व रितेश बाळू भुसारे, तसेच भावजयी पुष्पा बाळू भुसारे आले. त्यांनी आधी शिवीगाळ करून वाद घातला. यानंतर पत्नी व मुलाला मारहाण केली. तसेच शुभम व रितेश या दोघांनी लाकडी दांड्याने बाबासाहेब भुसारे यांना मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या शुभम बाळू भुसारे, रितेश बाळू भुसारे, पुष्पा बाळू भुसारे (सर्व रा. टोकी ता. गंगापूर) या तिघांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार गिरी तपास करीत आहेत.