छत्रपती संभाजीनगर : डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डीएलड) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत गुरुवारी, प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहीर झाली. जिल्ह्यात २०५७ जागांसाठी सोळाशे विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. फेरीत प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. राज्यस्तरीय डीएलएड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समितीच्या वतीने डीएलएड प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया सुरू आहे.
महंमद शरीफ यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर : महंमद शरीफ महंमद इस्माइल (वय ८४) यांचे आठ जूनला निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, तीन मुली आहेत. ते पालिकेत जीपचालक होते.






