छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजाबाजार परिसरातील श्री बालाजी मंदिरामध्ये गुरुवारी झालेल्या भागवत कथेप्रसंगी श्रीकृष्ण जन्माचा सजीव देखावा सादर करण्यात आला. यात वेदांत-गौरी दरगड यांचे पुत्र अभिराम याने बाळ कृष्णाची भूमिका निभावली. प्रफुल प्रफुल्ल मालाणी व किरण मालाणी यांनी नंद व यशोदाची भूमिका केली. तर, वासुदेवाच्या भूमिकेत विशाल दरगड होते. या कार्यक्रमाला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. आरती व पंजिरी - लाडूच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.






