सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई येथे बदली झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत २२ जून रोजी याबाबत काढलेल्या आदेशात महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे मुख्य अभियंता राजारामपुरी मोतीपुरी गोसावी यांची मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी प्रादेशिक विभाग कोकण येथे रिक्त पदी बदली करण्यात आली आहे.
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या मुख्य अभियंता छाया मोहन नाईक यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या शिबिर कार्यालय पुणे येथे बदली करण्यात आली आहे. भालकर यांच्या ३१ जुलै रोजीच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदी ही नियुक्ती असेल. नाईक यांच्या जागेवर छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता चव्हाण यांची बदली झाली आहे.