छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका बालवाडीत (प्रिस्कूल) तेवीस महिन्यांच्या बालकाला सोमवारी सकाळी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकासह इतरांविरोधात बुधवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बालकाच्या शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा आहेत. या प्रकरणात आधी सीसीटीव्ही फुटेज देण्यास विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचा दावाही संस्थेने केल्याचा आरोप आहे.मुख्याध्यापक कांचन येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम माहेश्वरी, विजय रेड्डी, प्रादेशिक व्यवस्थापक मंगेश मुसळे, शाळेतील मदतनीस व इतरांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विष्णू विठोबा मुंढे करीत आहेत.
तक्रारदाराने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर संस्थेने सीसीटीव्ही फुटेज दिले.