Two Lakh Valuables Stolen From Hotel Owners House On Nagpur Mumbai Highway
दोन लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वैजापूर : नागपूर मुंबई महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकाच्या घराच्या खिडकीचे गज तोडून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एक लाख ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या मार्गावरील हॉटेल आराध्याचे सुरेश मापारी यांच्या घरी ही चोरीची घटना घडली.