Dr Rajesh Ragde Awarded Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Social Justice Award
डॉ. राजेश रगडे यांना पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक डॉ. राजेश नारायण रगडे यांना मराठवाडा- खान्देश विभागातून राज्यस्तरीय ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार ’ जाहीर झाला आहे. विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे व राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार २८ जून रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे होणाऱ्या ६ व्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.