घुले खुन प्रकरणी विशेष तपास पथक

महाराष्ट्र टाइम्स
establishment of special investigation team in ghule murder case
जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेलचालक विलास घुले यांच्या खून प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकातर्फे करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतचे आदेश काढले.

खुनानंतर झालेले रास्ता रोको आंदोलन, पोलिस ठाण्याच्या प्रांगणात अंत्यसंस्काराविना ठेवलेला मृतदेह यांमुळे पुन्हा एकदा केज परिसरात तणाव होता. विधानसभेच्या अधिवेशनात या संदर्भात मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहायक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांची विशेष पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक धनराज रूपचंद जारवाल, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम रामदास खटावकर, वालदार आनंद विष्णू मस्के, जफर अझर पठाण, मारूती देवीदास कांबळे, दीपक उत्तम खांडेकर त्यांना साह्य करतील.