खंडणी उकळणारी टोळी जेरबंद

महाराष्ट्र टाइम्स

बंडगार्डन पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी रिक्षातील प्रवाशांना मारहाण करून खंडणी उकळत होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी एका प्रवाशाकडून २५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने मागितले. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि काही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

gang extorting ransom arrested four detained for beating and demanding money from passengers

चौकशीदरम्यान त्याच्या साथीदारांची नावे समोर आली. त्यानुसार अतुल रवींद्र गायकवाड (वय ३८) आणि संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१) यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन मार्च २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा; तसेच खंडणीपैकी १० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षातील प्रवाशास मारहाण करून ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. गुलटेकडी परिसरातील ही टोळी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही चित्रफितींच्या आधारे गजांआड गेली.

या प्रकरणी धनिष कुमार हेरेंद्र प्रसाद (वय २२, व्यवसाय- सेंट्रिंग काम, सध्या रा. बालगंधर्व चौक परिसर, डेक्कन, पुणे; मूळ रा. बिहार) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचा मित्र सत्येंद्र महतो (वय ४१, मूळ रा. बिहार) याला रिक्षातील चार अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या पत्नीकडून ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये मागवून घेतले.

या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांच्या सूचनेनुसार, तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही चित्रफितींच्या आधारे संशयितांचा गुलटेकडी परिसरात शोध घेतला. त्यानुसार गणेश आण्णा जगधने (वय २९) आणि अमोल उत्तम गायकवाड (३२) यांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता व पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.