पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला महिला विशेष बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. शहरातील एकूण ३१ मार्गांवर धावणाऱ्या बसमध्ये हा लाभ घेता येणार आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमपीआरडीए’ हद्दीत सेवा दिली जाते. त्यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महिला विशेष बस सुरू केल्या आहेत. सध्या ३३ बसच्या माध्यमातून ७६ महिला विशेष फेऱ्यांद्वारे ही सेवा दिली जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत महिला विशेष बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. यंदा आठ मार्चला महिला प्रवाशांनी मोफत (विनातिकीट) बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महिला विशेष बसचे मार्ग
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट क्र.१० ते मनपा भवन, कात्रज ते शिवाजीनगर, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, धनकवडी ते न. ता. वाडी, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते निगडी भक्ती-शक्ती, हडपसर ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर गाडीतळ, हडपसर ते मांजरी बु., मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, निगडी ते मेगापॉलिस हिंजवडी, मनपा भवन ते भोसरी, भोसरी ते हिंजवडी माण फेज ३, भोसरी ते निगडी, भोसरी ते पिंपरी गाव, भोसरी ते चिंचवड गाव, चिखली ते डांगे चौक, भेकराईनगर ते वाघोली, शेवाळेवाडी ते पिंपळे गुरव, शेवाळेवाडी ते कात्रज, मनपा भवन ते म्हाळुंगे गाव.





