खारघर सेक्टर १५ येथील स्पॅगेटी तलावामागील लोखंडी पुलाजवळ ४ मार्च रोजी भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना घडली.
येथील स्नेहा खंडू पाटील (५९, रा. करंजाडे, पनवेल) या दुपारी सव्वा चारच्या सुमारास पायी जात असताना एका लुटारूने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची १३ ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावली. त्यानंतर तो साथीदारासह दुचाकीवरून फरार झाला.
या प्रकरणी खारघर पोलिसांनी विविध कलमांन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोराचा शोध सुरू आहे.





