श्रेया बुगडे यांना राम नगरकर पुरस्कार

महाराष्ट्र टाइम्स

अभिनेत्री श्रेया बुगडे यांना राम नगरकर कलागौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते १४ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात दिला जाईल. राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचतर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरणानंतर श्रेया बुगडे यांची राजेश दामले मुलाखत घेतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

श्रेया बुगडे यांना राम नगरकर पुरस्कार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यंदाच्या ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते १४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’ अशी घोषणा राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर यांनी केली.

राम नगरकर कला अकादमी आणि ‘बेलवलकर सांस्कृतिक मंचतर्फे प्रसिद्ध विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी विनोदाची परंपरा पुढे नेणाऱ्या कलाकाराला ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचे पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर प्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत घेतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.