निवडणुकीसाठी भाजपची समिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
bjp announces election committee for pune teacher and graduate constituency
पुणे : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग देत निवडणूक समिती गठित केली असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांची समितीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद लाड आणि शिक्षक प्रकोष्ठाचे संयोजक डॉ. प्रशम कोल्हे यांची सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.