Dont Mess With Puneites Good Discussion Among Legislators Against Student Protest
पुणेकरांशी पंगा घेऊ नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : ‘पुणे हे नेहमी सर्वांना दिशा देण्याचे काम करते. पुणे बंद करण्याची भूमिका घेतली जात असेल, तर पुणेकरच त्या लोकांना कसे बंद करतील, हे कळणार नाही. पुणेकरांशी कोणी पंगा घेऊ नये, असा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे,’ अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी आमदार रोहित पवार यांच्या ‘पुणे बंद’ करण्याच्या धमकीवर दिली.
‘एमपीएससी’च्या परीक्षापद्धतीसह विविध मागण्यांसाठी शास्त्री रस्त्यावरील पुण्यातील अहिल्या अभ्यासिका येथे आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी संवाद साधला.अधिवेशनामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांच्या पावणे तीस तास बैठका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असून, आणखी काही मागण्या असतील, तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आज आंदोलनस्थळी आलो आहे, असे डावखरे म्हणाले.
‘एमपीएससी’ची परीक्षा वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) पद्धतीने घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांचे शास्त्री रस्त्यावरील अहिल्या अभ्यासिका येथे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.