Contributed by: नवी दिल्ली,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारताला सन २०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘वी विल डू इट’ ( आपण करून दाखवू ) हा नारा दिला. भारत विकसित होईपर्यंत ‘ना थकुंगा, ना रुकुंगा’, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी राष्ट्रविकासाचे लक्ष्य फार दूर नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा’ सोहळ्यात मोदी बोलत होते. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि प्रमुख नेते लखनऊहून आभासी पद्धतीने सहभागी झाले.७ ऑक्टोबर, २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून प्रशासनाच्या प्रमुख पदावर सलग २५ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मोदी यांनी जनतेचे आभार मानले. आपल्या सुमारे तासाभराच्या भाषणात त्यांनी ‘वी विल डू इट’ या संकल्पनेवर भर दिला. ‘१४० कोटी भारतीय मिळून सन २०४७पर्यंत विकसित भारत घडवतील आणि आपण हे करूनच दाखवू’, असे मोदी म्हणाले. भारताच्या प्रगतीला खीळ बसण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणुकांमध्ये मतांच्या राजकारणासाठी जात आणि समाजाच्या आधारावर (पान ४वर)